मराठी में पढ़ने के लिए नीचे जाएँ।
n
“चलो, अब समय के इस लौह कारागार को तोड़ें
n
चलो, फिर ज़िन्दगी की धार अपनी शक्ति से मोड़ें
n
पराजय से सबक लें, फिर जुटें, आगे बढ़ें फिर हम!…”
nn
‘भगतसिंह जनअधिकार यात्रा’ के बीसवें दिन की शुरुआत दादर से हुई जो कभी ट्रेड यूनियन हड़तालों व मज़दूर आन्दोलनों के लिए जाना जाता था। हालांकि आज ऐसा कोई भी आन्दोलन सक्रिय नहीं है, मगर उसकी सम्भावनाएं बिल्कुल मौजूद हैं। शिव सेना ने, जिसकी शुरुआत ट्रेड यूनियन में फूट डालने के मक़सद से की गयी थी, समय के साथ मराठी अस्मितावादी राजनीति और हिन्दुत्ववादी राजनीति को बढ़ावा देने का काम किया। इस राजनीति ने मज़दूर वर्गीय पक्ष को कुन्द करने का काम किया है। आज भी मुम्बई में असंगठित मज़दूरों की एक बड़ी आबादी मौजूद है, जो मुम्बई को चलाने और चमकाने का काम करती है। यहां की आधी आबादी झुग्गी झोपड़ियों में बेहद ख़राब स्थिति में जीने को मजबूर है। मुम्बई एक ऐसे ज्वालामुखी के दहाने पर बैठा है जो कभी धधक सकता है।
nn
जब ‘भगतसिंह जन अधिकार यात्रा’ ने दादर में प्रवेश किया तो यहां बड़ी-बड़ी गगनचुम्बी इमारतें देखने को मिली। साथ ही दिखे पुराने बन्द हो चुके मिल और कुछ चॉल। अभियान के दौरान एक बुज़ुर्ग मिले जिन्होंने बताया कि लाल झण्डा अभी कहीं यदा-कदा ही यहाँ दिखता है, पर उनकी जवानी के दौर में यहाँ लाल झण्डे वालों का ही बोलबाला था। आज जिस तरह स्मृतियों पर धूल चढ़ चुकी है, उसी प्रकार यहाँ मौजूद आबादी के बीच से उनके इतिहास को मिटाया जा चुका है और संघर्ष की जगह ले ली है पस्तहिम्मती और निराशा ने! इसी तरह पूरे देश में पसरी पस्तहिम्मती और निराशा को तोड़ने के लिए ‘भगतसिंह जन अधिकार यात्रा’ निकली है।
n
कल की यात्रा के दूसरे हिस्से में ठाणे इलाके से भी गुज़री। इसमें छोटा औद्योगिक इलाक़ा भी शामिल था। वक्ताओं ने मज़दूरों व निम्न मध्यमवर्गीय आबादी के मुद्दों के बारे में बात रखी। उन्होंने बताया कि आज मोदी सरकार के राज में बढ़ रही बेरोज़गारी, महँगाई के कारण आम जन के हालात बदतर होते जा रहे हैं। साथ ही मोदी सरकार द्वारा लाये गये चार लेबर कोड सीधे-सीधे मज़दूरों को आधुनिक ग़ुलामों की क़तार में शामिल कर देंगे।
nn
तमाम व्यस्तताओं के बावजूद लोगों ने न केवल सभाओं में रुक कर हमारी बात सुनी बल्कि ज़्यादातर लोगो ने सहमति दर्ज़ करायी। हमारे द्वारा निकाली गयी पुस्तिका ‘मेहनतकश के हालात’ बहुत सारे मज़दूरों ने ली। कई लोगो ने यात्रा से जुड़ने की इच्छा जताते हुए अपने सम्पर्क नम्बर भी दिये।
nn
•
n
“चला, आता काळाच्या या पोलादी तुरूंगाला तोडूया
n
चला, परत जीवनाच्या गतीला आपल्या शक्तीने वळवूया
n
पराजयातून धडा घेऊया, परत एकजूट होऊया, पुढे जाऊया!..”
nn
मुंबईतील कामगार चळवळीचा मोठा इतिहास राहिला आहे. हे तेच ठिकाण आहे जिथे नौसेना विद्रोह आणि ट्रेड युनियन चळवळीने कामगार ऐक्याची ताकद दाखवली होती.
nn
‘भगतसिंह जन अधिकार यात्रे’च्या विसाव्या दिवसाची सुरूवात दादर येथून झाली जे एकेकाळी ट्रेड युनियन संपांसाठी आणि कामगार चळवळींसाठी ओळखले जायचे. आज अशी कुठलीही चळवळ अस्तित्वात नसली तरी त्याच्या शक्यता नक्कीच अस्तित्वात आहेत. कामगार वर्गीय आंदोलन नष्ट करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या शिवसेनेने मराठी अस्मितेचे राजकारण आणि हिंदुत्वाचे राजकारण पुढे नेले, ज्याने कामगार वर्गीय राजकारण बोथट करण्याचे काम केले. आजही मुंबईत असंघटित कामगारांची मोठी लोकसंख्या आहे, जी मुंबईला चालवण्याचे काम करते. येथील निम्म्या लोकसंख्येला झोपडपट्ट्यांमध्ये अत्यंत गरीब परिस्थितीत राहावे लागते. मुंबई अशा ज्वालामुखीच्या तोंडावर आहे जो कधीही भडकू शकतो.
nn
जेव्हा ‘भगतसिंह जन अधिकार यात्रा’ दादरमध्ये दाखल झाली तेव्हा इथे मोठमोठ्या गगनचुंबी इमारती दिसल्या. जुन्या बंद गिरण्या आणि काही चाळीही दिसल्या. पदयात्रे दरम्यान, एक वयस्क व्यक्ती भेटले ज्यांनी आम्हाला सांगितले की येथे आता लाल झेंडा फक्त अधूनमधून दिसतो, परंतु त्यांच्या तरुणपणाच्या काळात मात्र इथे लाल झेंड्याचेच वर्चस्व होते. आज ज्याप्रमाणे आठवणींवर धूळ बसली आहे, त्याचप्रमाणे येथील लोकसंख्येतून त्यांचा इतिहास पुसला गेला आहे आणि संघर्षाची जागा निराशेने घेतली आहे. परंतु देशभरात पसरलेल्या या निराशेला वाचा फोडण्यासाठी भगतसिंह जन अधिकार यात्रा निघालेली आहे.
n
कालच्या दुसऱ्या सत्रात पदयात्रा ठाणे परिसरातून गेली. यामध्ये छोट्या औद्योगिक क्षेत्राचाही समावेश होता. पदयात्रेतील कार्यकर्त्यांनी कामगार आणि निम्न मध्यमवर्गीय लोकांच्या प्रश्नांवर भाष्य केले. आज मोदी सरकारच्या राजवटीत वाढती बेरोजगारी आणि महागाईमुळे सर्वसामान्यांची अवस्था बिकट होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोदी सरकारने आणलेल्या चार कामगार संहितांमुळे कामगारांना थेट आधुनिक गुलामांच्या श्रेणीत समाविष्ट केले जाईल.
nn
व्यस्त दैनंदिन कामकाजातून वेळ काढून लोकांनी थांबून आमचे म्हणणे ऐकले, अनेक लोक सहमत झाले. अनेक कामगारांनी आम्ही प्रकाशित केलेली ‘कामगार-कष्टकऱ्यांची परिस्थिती’ ही पुस्तिका घेतली. अनेकांनी यात्रेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांचे संपर्क क्रमांकही दिले.